चांदीला आली सोन्याची झळाळी; भावात 'एवढी' वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली: चांदीच्या भावाने दिल्लीत आज 2 हजार 360 रुपयांची उसळी घेतली. सोन्याचा भावात मात्र, 58 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. 

जागतिक पातळीवर अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या भीतीने गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडून डॉलरकडे मोर्चा वळविला. याचा फटका आज सोन्याला बसला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावात घसरण होऊन तो प्रतिऔंस 1 हजार 460 डॉलरवर आला. चांदीचा भाव प्रतिऔंस 16.95 डॉलरवर स्थिर राहिला. 

दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 58 रुपयांची घसरण होऊन 38 हजार 140 रुपयांवर आला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 2 हजार 360 रुपयांनी वाढून 47 हजार 580 रुपयांवर आला. आज दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या भावातील घसरण काही प्रमाणात रोखली गेली, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटिजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटिज) यांनी दिली. 

मुंबईत भावात घसरण 
मुंबईतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 308 रुपयांची घसरण होऊन 37 हजार 375 रुपयांवर आला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही 307 रुपयांची घट होऊन 37 हजार 225 रुपयांवर आला. चांदीचा भाव आज प्रतिकिलोमागे किरकोळ पाच रुपयांची घट होऊन 44 हजार 325 रुपयांवर आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: silver prices surge