शिओमी जगातील सर्वात मोठा आयपीओ आणणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

हाँगकाँग: स्मार्टफोन कंपनी असलेली शिओमी लवकरच हाँगकाँगच्या शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करणार आहे. ब्लूमबर्गच्या मते, 2014 बाजारात येणारा हा जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. कंपनीचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सच्या घरात पोचण्याची शक्यता आहे.  अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने 2014 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 21.8 अब्ज डॉलरचा निधी उभारला होता. 

कंपनीने संपूर्ण आर्थिक स्थिती गुंतवणूकदारांसमोर मांडत बाजारात आयपीओ आणत असल्याची घोषणा केली. कंपनीचे उत्पन्न  2017 मध्ये 114.62 अब्ज युआनवर (18 अब्ज अमेरिकी डॉलर्स) पोचले असून  2016 च्या तुलनेत त्यात 67.5 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. 

स्मार्टफोनबरोबरच शिओमी इंटरनेटशी जोडलेली घरगुती उपकरणे आणि गॅझेट्स बनविते. त्याचबरोबर स्कूटर, एअर प्युरिफायर्स आणि राइस कुकरसह डझनभर इतर घरगुती उपकरणे तयार करते.  स्मार्टफोन बाजारात स्वस्त स्मार्टफोन सादर करून शिओमीने सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणि ऍपल इंकसमोर आव्हान उभे केले आहे. 

Web Title: Smartphone Maker Xiaomi Files For World's Biggest IPO Since 2014