…त्यामुळे तुम्ही प्रवासातही रहाल सुरक्षित!!

So you stay safe on travel!
So you stay safe on travel!

व्हिसासाठी अर्ज करणे, तिकिटे आरक्षित करणे आणि विमानप्रवास या व्यतिरिक्तही सुटीला एक महत्त्वाचा आयाम असतो, तो प्रवास विम्याचा. काही अनपेक्षित दुर्घटना घडली, तर प्रवास विम्यामुळे त्यापासून तुमचे संरक्षण करणे शक्य होऊन तुमची सुटी तुम्ही अधिक शांततेत व्यतीत करू शकता.

तुम्ही एकदा विम्याचे कवच घेतले, की तुमची सर्व कागदपत्रे योग्य क्रमाने लावली आहेत ना, तुमच्या प्रवासाच्या सामानात ती व्यवस्थित ठेवली गेली ना, याची खात्री करून घ्या.

प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील काही गोष्टींची खात्री करून घ्या,

- तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाण्याच्या गोष्टींची यादी करत असाल, तर त्यामध्ये तुमच्या प्रवास विम्याशी संबंधित कागदपत्रांचा समावेश झाला आहे ना, याची खात्री करा. यामुळे तुम्हाला विमा पुरवठादारापर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल.

- तुमच्या मोबाइल फोनमध्ये सर्व कागदपत्रांचे दस्तावेजीकरण करा. तुमच्या प्रवासाच्या बॅगचे आणि त्यातील वस्तूंचे एक छायाचित्र घेऊन ठेवा. म्हणजे तुमची बॅग हरवली किंवा चोरीला गेली, तर विमा पुरवठादारांना तुमच्या बॅगमध्ये काय काय होते, याची माहिती पुरवणे तुम्हाला शक्य होईल.

- एखादी दुर्घटना किंवा अपघाताच्या वेळी, तुमच्या विमा पुरवठादाराशी दिलेल्या कालावधीत संपर्क साधा. विमा कंपनीच्या कॉल सेंटरशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यांना सहल रद्द झाल्याची, प्रवासाच्या दिवसांची, बॅग हरवल्याची, विमान चुकल्याची किंवा वैद्यकीय तातडीची लगेच माहिती द्या.

- विमा पुरविणा-याशी तुम्ही जेव्हा संपर्क साधता, तेव्हा त्यांना जितके तपशील पुरवता येतील, तेवढे पुरवा. यानंतर तुम्हाला विमा पुरवठादाराकडून आलेला विम्याच्या हमी रकमेसाठीचा अर्ज भरता येऊ शकेल.

प्रवास विम्यासाठी अर्ज करताना वस्तू हरवल्याचा, प्रवासाला झालेला उशीर किंवा आजार याचा पुरावा देणे आवश्यक आहे. यातील आवश्यक गोष्टींमध्ये चोरी किंवा इतर गुन्ह्याच्या बाबतीत पोलिस अहवाल, विमानात प्रवासाचे सामान हरवले असल्यास विमान कंपनीचे लेखी जबाब, प्रवासात वैद्यकीय मदत घेतली असेल, तर त्याचे तपशील आदींचा समावेश होतो.

तुम्ही प्रवासाचे सामान भरताना, तसेच पर्यटनाच्या ठिकाणी पोहोचल्यावरही हे काही सोपे नियम पाळले, तर कोणत्याही आपत्तीच्या वेळी तुम्हाला अडचणी येणार नाहीत. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही विम्याच्या रकमेकरिता अर्ज करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार राहू शकता आणि प्रवास विम्याचे लाभ मिळवू शकता.

- डॉ. जयदीप देवरे

(लेखक महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com