Sonata Softwareकडून 700% अंतरिम डिव्हिडेंड जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonata software

Sonata Softwareकडून 700% अंतरिम डिव्हिडेंड जाहीर

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेडने (Sonata Software Limited) 2022-23 आर्थिक वर्षासाठी 700 टक्के म्हणजेच 7 रुपये प्रति शेअर अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने ही माहिती दिली.

कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 18 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत प्रति शेअर 7 रुपये अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केल्याचे आयटी कंपनी सोनाटाने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. अंतरिम डिव्हिडेंडची रेकॉर्ड तारीख 1 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा: आता सोनाटा गणेशोत्सव फक्त एका क्लिकवर...SONATA GANESHOTSAV

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ही एक जागतिक दर्जाची टेक्नॉलॉजी  कंपनी आहे. बिझनेस इंटेलिजन्स, ऍनालिटिक्स, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, मोबिलिटी, क्लाउड, सोशल मीडिया, एंटरप्राइझ सर्व्हिसेज आणि इंफ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेजची प्रोव्हायडर आहे.

सोनाटा सॉफ्टवेअरचा डिव्हिडेंड देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. कंपनीने नोव्हेंबर 2000 पासून 46 वेळा लाभांश दिल्याचे ट्रेंडलाइन डेटामधून समजते आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 2100 टक्के म्हणजे प्रति शेअर 21 रुपये डिव्हिडेंड देण्याचे जाहीर केले होते, जे शेअरच्या सध्याच्या किमतीच्या 4 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रजिस्टर्ड शेयरहोल्डर्सना इलेक्ट्रॉनिक मोड किंवा डिव्हिडेंडच्या माध्यमातून 14 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा नंतर डिव्हिडेंड दिला जाईल.

हेही वाचा: Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी

सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर 24 टक्क्यांनी वाढून 112.7 कोटी रुपये झाले. त्याच वेळी या कालावधीत महसूल 55 टक्क्यांनी वाढून 1,496 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: Stock : बँकिंग स्टॉक येत्या काळात देईल 56% नफा, आता गुंतवणूकीची चांगली संधी...

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.