आता ‘ट्राय’ला सांगा तुमच्या मोबाईल कॉल्सचा दर्जा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचं गाऱ्हाणं लवकरच सरकार ऐकून घेणार आहे. दूरसंचार नियामक मंडळ 'ट्राय'ने एक असे मोबाईल अॅप्लिकेशन सादर करण्याची घोषणा केली आहे ज्यावरुन ग्राहकांना मोबाईलवरुन होणाऱ्या कॉल्सचं मूल्यमापन(रेटिंग) करता येणार आहे. हे अॅप दाखल झाल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक कॉलला स्वतंत्र रेटिंग देता येणार आहे.

"आम्ही ग्राहकांसाठी दोन उपक्रम सादर करीत आहेत. यापैकी एक म्हणजे कॉल पुर्ण झाला की ग्राहकांना त्याचे मूल्यमापन करता येईल.", असे ट्रायचे अध्यक्ष आर एस शर्मा म्हणाले. दूरसंचार नियामक मंडळाच्या स्थापनेला वीस वर्षे पुर्ण झाली त्यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महिनाअखेर हे अॅप्लिकेशन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. भारतात कोट्यवधी लोक मोबाईल वापरतात. जरी कमीत कमी लोकांनी आपला अभिप्राय दिला तर ही माहिती उपयोगी ठरु शकते आणि ट्रायला मिळालेला हा डेटा संशोधन संस्था आणि इतर संस्थांनादेखील उपलब्ध करुन दिला जाईल असेही शर्मा यांनी सांगितले.

याशिवाय, ग्राहकांना अनावश्यक कॉल्सपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी 'डू नॉट डिस्टर्ब' नोंदणी कार्यक्रम आणखी मजबूत करण्याची तयारी सुरु आहे.चालू नियमांमुसार ग्राहकांना अनावश्यक कॉल्स बंद करता येतात. तरीदेखील अशा ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्या कंपन्यांना मोठा दंड आकारला जाऊ शकतो. परंतु आता या दोन उपक्रमांमुळे ग्राहकांचा त्रास थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Soon, a mobile app from Trai to rate your call quality