सोने फिके पडले

पीटीआय
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई : मागील काही दिवसांच्या घडामोडींनंतर आज सोन्याच्या भावात तीस हजारांच्या घरात आले आहे. आज सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १२० रुपयांची घसरण झाली. चांदीही प्रतिकिलो ३३५ रुपयांनी उतरल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले. दोन आठवड्यांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्‍यतेचा परिणाम सोन्याच्या भावावर झालेला दिसत आहे.

जागतिक बाजारात सोन्याचे भाव सलग चौथ्या सत्रात घसरले. युरोपीय बाजारात प्रतिऔंस १,३१२ डॉलरवर सोन्याचे भाव स्थिर होते. चांदीचे युरोपीय बाजरातील भाव प्रतिऔंस १६.३० डॉलर इतका होता. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे स्थानिक सोने खरेदीदारांना मात्र फायदा होत आहे.

Web Title: sports news gold

टॅग्स