सेन्सेक्‍सच्या घोडदौडीला ब्रेक 

पीटीआय
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - खनिज तेलातील महागाई आणि व्यापारी तुटीची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.१६) विक्रीचा पवित्रा घेतला. त्यामुळे गेल्या तीन सत्रात तेजीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घोडदौडीला ब्रेक बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ७२.४६ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ७७१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ४१.१० अंशांची घट झाली आणि निफ्टी १० हजार ७०० अंशांवर स्थिरावला. 

निर्यातीची ताजी आकडेवारी आणि व्यापारी तूट वाढल्याने बाजारात दबाव निर्माण झाला आहे. सकाळपासून बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. यात कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, एसबीआय, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्‌स, एचडीएफसी, हिरो मोटोकॉर्प, कोटक बॅंक, इंड्‌सइंड बॅंक आदी शेअर घसरणीसह बंद झाले. खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल वितरकांच्या मार्जिनवर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी 

एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आदी शेअरची विक्री केली. दरम्यान आयटी सेवा  क्षेत्र चालू वर्षात पूर्वपदावर येईल, असा अंदाज मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने वर्तवल्यानंतर आयटी शेअर्सची मागणी वाढली. विप्रो, इन्फोसिस, टीसीएस आदी महत्त्वाचे शेअर्स वधारले.

Web Title: sports news share market sensex