esakal | स्टेट बॅंकेच्या गृहकर्जदरात घट 
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेट बॅंकेच्या गृहकर्जदरात घट 

भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणांच्या मोसमासाठी ठराविक गृहकर्जांच्या दरात पाव टक्के (०.२५ टक्के) कपात केली आहे. ७५ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घरांसाठी ही जादा सवलत लागू राहील. 

स्टेट बॅंकेच्या गृहकर्जदरात घट 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणांच्या मोसमासाठी ठराविक गृहकर्जांच्या दरात पाव टक्के (०.२५ टक्के) कपात केली आहे. ७५ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घरांसाठी ही जादा सवलत लागू राहील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत शुभमुहूर्तावर घरे घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. अशा ग्राहकांसाठी स्टेट बॅंकेने व्याजदरात जादा सवलत दिली आहे. ३० लाख ते दोन कोटी रुपये कर्जाची रक्कम असेल तर त्या घर खरेदीदारांना त्यांच्या सिबिल क्रेडिट मानांकनानुसार व्याजदरात ०.२० टक्के एवढी जादा सवलत मिळेल. हे कर्ज स्टेट बॅंकेच्या योनो ऍपवरून घेतले तर आणखी ०.०५ टक्के जास्त सवलत मिळेल. असे मिळून ही एकूण सवलत ०.२५ टक्के होईल. बॅंकेने यापूर्वीच ३० ते ७५ लाख रुपयांच्या गृहकर्जाच्या व्याजदरावर ०.१० टक्के सवलत जाहीर केली आहे. महिलांना त्यावरही जादा ०.०५ टक्के सवलत मिळेल. ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा स्टेट बॅंकेचा व्याजदर आता ६.९० टक्के एवढ्या कमी दरापर्यंत घसरला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image