स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेकडून दिलासा!

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

अन्य बॅंकांकडूनही त्यांचे लवकरच अनुकरण होणे अपेक्षित असून, त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज घेणाऱ्यांच्या मासिक हप्त्यात (इएमआय) कपात होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाला या बॅंकांनी सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या दरकपातीला प्रतिसाद देत स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बॅंक आणि खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेने आपल्या कर्जदरात कपात जाहीर करून कर्जदारांना दिलासा दिला आहे. नवे दर एक नोव्हेंबर 2016 पासून लागू होणार आहेत.

अन्य बॅंकांकडूनही त्यांचे लवकरच अनुकरण होणे अपेक्षित असून, त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज घेणाऱ्यांच्या मासिक हप्त्यात (इएमआय) कपात होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाला या बॅंकांनी सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे. स्टेट बॅंकेने आपला एमसीएलआर दर 0.15 टक्‍क्‍याने कमी करून 8.90 टक्के करणार असल्याचे जाहीर केले. बॅंकेचा सध्याचा एमसीएलआर दर 9.05 टक्के आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेशन बॅंकेनेदेखील एमसीएलआर दर 0.05 टक्‍क्‍याने कमी केला आहे. आयसीआयसीआय बॅंकेने "एमसीएलआर' पद्धतीनुसार कर्जदरात 0.10 टक्‍क्‍याची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. एमसीएलआर दराचा बॅंकांकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जातो. 

Web Title: State Bank of India, ICICI Bank cut lending rates