येस... ‘सहकारा’साठी राज्य बॅंक धावली

Yes-bank
Yes-bank

पुणे - ऑनलाइन बॅंकिंग व्यवहारासाठी येस बॅंकेच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या सहकारी बॅंकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने कोणत्याही अटी-शर्तीशिवाय आणि जादा मोबदला न घेता सेवा-सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या बॅंकेच्या प्लॅटफॉर्मचा वापर क्‍लिअरिंग, आरटीजीएस, एनईएफटी, युपीआय, आयएमपीएससाठी करणाऱ्या राज्यातील ७२ नागरी सहकारी बॅंकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सहकारी बॅंकेने या सर्व सहकारी बॅंकांसह जिल्हा बॅंकांना तातडीने सर्व सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सरकारी कर्जरोख्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची सुविधा तसेच बॅंकेकडे असणारा जादा निधी गुंतविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची लॅफ/कॉल ही सुविधाही उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

येस बॅंकेतून राज्य सहकारी बॅंकेद्वारे ऑनलाइन बॅंकिंग सेवा घेणाऱ्या बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेच्या ‘ना हरकत’ दाखल्याची आवश्‍यकता नाही, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. तसेच, येस बॅंकेने या सर्व सहकारी बॅंकांना सामूहिक ‘ना हरकत’ दाखला दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

राज्य बॅंकेला ‘अ’ दर्जा 
३१ मार्च २०१९ अखेर आर्थिक वर्षात राज्य सहकारी बॅंकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १५.६० टक्‍के असून, नेटवर्थ दोन हजार ६८२ कोटी इतके आहे. राज्य बॅंकेला सात वर्षांपासून ऑडिट ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच, सभासदांना १० टक्‍के लाभांश देण्यात येतो. १२ मार्च २०२० अखेर राज्य बॅंकेची आर्थिक उलाढाल ४१ हजार ५२१ कोटी इतकी आहे. येत्या ३१ मार्चअखेर राज्य बॅंकेचे नेटवर्थ तीन हजार २५० कोटीपर्यंत आणि नफा ४५० कोटींपर्यंत राहील, असा विश्‍वास बॅंक व्यवस्थापनाने व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com