स्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत

स्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी व्याजदरात वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बॅंकेने जुलैमध्ये रेपो लिंक्‍ड लेंडिंग रेटची सुरुवात केली असल्याने गृहकर्ज 8.05 टक्के दराने उपलब्ध होणार आहे. 

"एसबीआय'ने वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. याव्यतिरिक्त कार लोन 8.7 टक्के दराने उपलब्ध करून दिले आहे. जे सध्या इतर बॅंकांकडून कारसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या तुलनेत सर्वाधिक कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे योनो ऍपद्वारे कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास ग्राहकांना कर्जाच्या दरात आणखी 0.25 टक्‍क्‍याची सवलत देण्यात येणार आहे. पगारदार ग्राहकांना कारच्या ऑन-रोड किंमतीच्या 90 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. 

वैयक्तिक कर्ज वितरणाला चालना देण्यासाठी बॅंकेने 10.75 टक्के दराने वीस लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा परतफेडीचा कालावधी सहा वर्षांचा असेल. शिवाय पगारदार व्यक्तीला योनो प्लॅटफॉर्मद्वारे पाच लाखांचे कर्ज उपलब्ध असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

याशिवाय भारतात शिक्षणासाठी 50 लाख रुपये तर परदेशात शिक्षणासाठी 1.50 कोटी रुपये शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. शैक्षणिक कर्जाचा दर 8.25 टक्‍क्‍यापासून असून परतफेडीसाठी 15 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com