औषधांच्या ऑनलाइन विक्रीला स्थगिती

औषधांच्या ऑनलाइन विक्रीला स्थगिती

चेन्नई - औषधांच्या ऑनलाइन विक्रीला मद्रास उच्च न्यायालयाने काल अंतरिम स्थगिती दिली. ही स्थगिती नऊ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 

औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या वेबसाइट बंद करण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका तमिळनाडू केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी न्या. आर. महादेवन यांनी अशा विक्रीला तात्पुरती स्थगिती दिली. तसेच केंद्र सरकारला याबाबत बाजू मांडण्याचे आदेश दिले. औषधे ऑनलाइन मागविणे हे ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकते, मात्र बनावट, मुदत संपलेली, मान्यता नसलेली, असुरक्षित अशी औषधे या साखळीतून ग्राहकांपर्यंत पोचू शकतात, त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, असे ‘तमिळनाडू केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com