23 टक्के जन-धन खात्यांमध्ये अजूनही ‘झिरो बॅलन्स’

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: नोटबंदीच्या निर्णयामुळे पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांतील रोख रकमांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत ही रक्कम 64 हजार 252.15 कोटी रुपयांवर पोचली आहे. मात्र देशातील एकूण जन-धन खात्यांपैकी 23 टक्के

खात्यांमध्ये अजूनही 'जन धन' नाही. अशा खात्यांमध्ये अजूनही रक्कम भरली घेलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर जन-धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धनवर्षाव झाला होता. जन-धन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर होते. उत्तर प्रदेशमधील खात्यामध्ये 10 हजार 670 कोटी जमा झाले आहेत. त्यानंतर पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांचा नंबर लागतो.

आर्थिक सर्वसमावेशकतेच्यादृष्टीने गरीबांमध्ये बँकिंग व्यवहारांविषयी जागरुकता वाढविण्यासाठी जन धन योजना सुरु करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोट रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी आपला काळा पैसा या खात्यांमध्ये जमा केल्याचे समोर आले आहे.

Web Title: Still accounts for 23 per cent of public money 'zero balance'