स्टील सिटी सिक्युरिटीजचा आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

विशाखापट्टणम: स्टील सिटी सिक्युरिटीज लिमिटेडचा आयपीओ आजपासून (ता.6 फेब्रुवारी, सोमवार) खुला होणार आहे. कंपनी प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून रु.26.99 कोटींचा निधी उभारणार आहे.

कंपनीचे कार्यकारी संचालक के सत्यनारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी दहा रुपये दर्शनी मूल्याच्या 49,08,000 शेअर्सची विक्री करणार आहे. गुंतवणूकदारांना प्रतिशेअर रु.55 प्रमाणे शेअर्सची विक्री केली जाणार आहे. आयपीओसाठी 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

1995 मध्ये कंपनीची स्थापना झाली असून देशभरातील 500 शहरांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे. आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा उपयोग करून कंपनीच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यात येणार आहे.

Web Title: still security IPO open now