शेअर निर्देशांकात किरकोळ घट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मुंबई - परकी गुंतवणुकीचा बाहेर पडणारा ओघ आणि तेजीत वधारलेल्या शेअर्समधील नफावसुलीने गुरुवारी (ता.१) बाजारात घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात १० अंशांची घट झाली आणि तो ३४ हजार ४३१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय बाजाराच्या निर्देशांकात ६.१५ अशांची घट झाली आणि निफ्टी १० हजार ३८० अंशांवर बंद झाला.

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद निवळल्याच्या पार्श्‍वभूमीवर सकाळच्या सत्रात बाजारात तेजी दिसून आली. खनिज तेलातील स्वस्ताई आणि रुपया वधारल्याने तेजीला बळ मिळाले. मात्र हे तेजी अल्पकालावधीची ठरली. बुधवारच्या (ता.३१) सत्रात वधारलेल्या शेअर्समध्ये नफावसुली सुरू झाली. माहिती तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा सपाटा सुरू होता. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो आदी शेअर घसरणीसह बंद झाले. आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी आदी शेअर घसरले. 

रुपया ५० पैशांनी वधारला
चलन बाजारात रुपया आज डॉलरच्या तुलनेत ५० पैशांनी वधारला. दिवसअखेर रुपया ७३.४५ वर बंद झाला. निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाला बळ मिळाले. गेल्या तीन आठवड्यांमध्ये एका सत्रात रुपयाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. बुधवारी रुपयात २७ पैशांचे अवमूल्यन झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stock index declined marginally