शेअर निर्देशांकाची त्रिशतकी झेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.१९) चौफेर खरेदीला प्राधान्य दिले. बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याच्या शक्‍यतेने बाजारात तेजी लाट दिसून आली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३१७.७२ अंशांच्या वाढीसह ३५ हजार ७७४.८८ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८१.२० अंशांची वृद्धी झाली. निफ्टी १० हजार ७६३.४० अंशांवर स्थिरावला. 

येस बॅंकेच्या शेअरमध्ये सात टक्‍क्‍यांची वाढ झाली. टाटा समूहाने जेट एअरवेजच्या खरेदीबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाल्याचे स्पष्ट केल्याने जेट एअरवेजच्या शेअरला झळ बसली. जेट एअरवेजच्या शेअरमध्ये ६.८८ टक्‍क्‍यांची घट झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stock Index Share