शेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुंबई - केंद्र सरकारवरील अविश्‍वास ठरावाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी विक्रीला प्राधान्य दिले. यामुळे मुबंई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २२ अंशांच्या घसरणीसह ३६ हजार ३५१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३ अंशांची घट होऊन १० हजार ९५७ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍सने आज सकाळच्या सत्रात उभारी घेतली होती. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, तेल आणि वायू आणि ऊर्जा आदी क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. तसेच, अदानी पॉवर, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, सेंच्युरी, कॅनरा बॅंक, वेदांता, भारती एअरटेल, येस बॅंक यांच्या समभागात वाढ झाली. 

बंधन बॅंक तेजीत
पहिल्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी करणाऱ्या बंधन बॅंकेच्या समभागाला आज मागणी दिसून आली. बंधन बॅंकेचा समभाग ३ टक्‍क्‍यांनी वधारून ६१८.१५ रुपयांवर बंद झाला. बॅंक ऑफ इंडिया, एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, अलाहाबाद बॅंक आदी बॅंकांचे समभाग तेजीसह बंद झाले. 

Web Title: stock market to decline