जागतिक परिस्थितीमुळे शेअर बाजारात घसरण

पीटीआय
Friday, 14 February 2020

जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारदेखील घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १०६ अंशांनी घसरून तो ४१ हजार ४५९ अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६ अंशांनी घसरण झाली. तो १२ हजार १७४ अंशांवर बंद झाला.

मुंबई - जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारदेखील घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १०६ अंशांनी घसरून तो ४१ हजार ४५९ अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६ अंशांनी घसरण झाली. तो १२ हजार १७४ अंशांवर बंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महागाईचा उच्चांक आणि औद्योगिक विकासाच्या सुमार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी बाजारात शेअर विक्रीला अधिक प्राधान्य दिले. तसेच, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे चीनमधील व्यवहार थंडावले आहे. परिणामी चिनी अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याने त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

औद्योगिक उत्पादनात घट

महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपातीची शक्‍यता पुन्हा धूसर झाल्यामुळे व्याजदराशीसंबंधित बॅंक, फायनान्स आणि ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stock market declines due to global situation