शेअर बाजाराचा नकारात्मक पातळीवर शेवट

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई: काही बँकिंग शेअर्समध्ये नफावसुली सुरु झाल्यामुळे आज (मंगळवार) सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचा नकारात्मक शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 अंशांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 9150 अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीखाली गेला. अखेर सेन्सेक्स 94.56 अंशांच्या घसरणीसह 29319.10 पातळीवर बंद झाला. दरम्यान, निफ्टी 34.15 अंशांच्या घसरणीसह 9105.15 पातळीवर स्थिरावला.  

धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील तेजीच्या पार्श्वभूमीवर सकाळी सेन्सेक्समध्ये सुमारे 250 हून अधिक अंशांची वाढ झाली होती. निफ्टीनेदेखील 9200 अंशांची पातळी पार केली होती. परंतु, दुपारच्या सत्रात बाजारातील चित्र पालटले. बँकिंग क्षेत्रातील किरकोळ तेजी वगळता इतर सर्व क्षेत्रांचा शेवट नकारात्मक पातळीवर झाला.

निफ्टीवर अरबिंदो फार्मा, एनटीपीसी, हिंडाल्को, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक तेजीत होते तर टाटा स्टील, अंबुजा सिमेंट्स, कोल इंडिया, आयशर मोटर्स आणि भारती इन्फ्राटेलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले होते.

Web Title: stock market down