Share Market: शेअर बाजाराची उसळी! सेन्सेक्स-निफ्टीने गाठला अडीच महिन्यातील उच्चांक

अडीच महिन्यानंतर प्रथमच सेन्सेक्सने 60000चा तर निफ्टीनेही18000चा टप्पा ओलांडला.
Today's Share Market Updates | Stock Market News
Today's Share Market Updates | Stock Market Newssakal media

Share Market Update: शेअर बाजारातील तेजीचं सत्र आजही सुरु झाले. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात आज मोठी वाढ झाली. तब्बल अडीच महिन्यानंतर म्हणजेच 18 जानेवारीनंतर प्रथमच सेन्सेक्सने 60000चा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही 18000 हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसअखेर सेन्सेक्स 1335.05 अंकांनी म्हणजेच 2.25 टक्क्यांनी वधारून 60611.74वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये तब्बल 382.95 अंकांची म्हणजेच 2.17 टक्क्यांची वाढ होऊन 18,053.40वर बंद झाला. (Stock market on Top ! Sensex-Nifty hits two-and-a-half month high)

Today's Share Market Updates | Stock Market News
Share Market: नव्या आर्थिक वर्षाची चांगली सुरुवात, कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

सेन्सेक्सने आज सकाळी 10:30 पर्यंत साधारणपणे 1400 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 60845 अंकांचा उच्चांक गाठला तर निफ्टीनेही 305.55 अंकांच्या वाढीसह 18114.65 चा अडीच महिन्यांतील उच्चांक गाठला. 18 जानेवारी 2022 नंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 60000 आणि 18000 चा टप्पा गाठला.

Today's Share Market Updates | Stock Market News
Share Market: अडीच महिन्यांनंतर गाठला उच्चांक; SENSEX 60000, NIFTY चा धमाका

तत्पूर्वी आज सकाळी शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवातही तेजीने झाली. सेन्सेक्स 487.44 अंकांनी वधारून 59,764.13 वर सुरु झाला तर निफ्टी 138.65 अंकांच्या वाढीसह 17,809.10वर सुरु झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com