esakal | ऑगस्टमध्ये ऑटो, मिडकॅप बँकिंगमध्ये मोठा धमाका? या दोन शेअरवर ठेवा लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

ऑटो, मिडकॅप बँकिंगमध्ये मोठा धमाका? या दोन शेअरवर ठेवा लक्ष

sakal_logo
By
सुमित बागुल

IIFL सिक्यूरिटीजचे डायरेक्टर संजीव भसीन यांचा शेअर बाजारातील अनुभव दांडगा आहे. तब्बल 32 वर्षांपासून ते शेअर बाजाराशी जोडले आहेत. IIFL सिक्यूरिटीजचे क्लायांट्स त्यांनी दिलेल्या टिप्स वरून वर्षानुवर्षे फायदा कमावत आहेत. त्यामुळेच त्यांच्या टिप्सची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत असतात.

कोणकोणत्या स्टॉक्सवर आहे संजीव भसीन यांची नजर पाहूयात...

शेअर बाजारात सध्या रिओपनिंग होताना दिसते आहे. महाराष्ट्रात बार आणि हॉटेल्स सुरू होणार आहेत. मोठ्या हॉटेल्समध्ये पुढचे 3 महिने बुकिंग मिळणेही कठीण जाणार आहे. निफ्टी भलेही 16000 च्या पार नाही जाऊ शकला. पण बाजारात तेजी मात्र दिसून येत आहे. एकीकडे टाटा स्टील 1500 आणि अल्ट्राटेकचा स्टॉक 7800 रुपये झाला आहे. त्यामुळेच येत्या ऑगस्ट महिन्यात ऑटो आणि बँकिंगच्या स्टॉक्समध्ये चांगली तेजी दिसून येईल आणि हे दोन्ही सेक्टर ऑउटपरफॉर्म करतील असं बोललं जातंय.

हेही वाचा: पगार, EMI पासून ATM शुल्कापर्यंत उद्यापासून बदलणार नियम

  • BUY - RBL Bank @ 190

  • SL 187

  • TGT 200-210

संजीव भसीन यांनी गुंतवणूकदारांना RBL Bank बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मिडकॅप सेगमेंटमधील या बँकेकडून खूप आशा असल्याचे भांसिन म्हणाले. पुढच्या महिन्यात याचा रिझल्ट आहे आणि तो खूप चांगला येईल अशी आशा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हा स्टॉक खरेदी करा असे भसीन यांचे म्हणणे आहे . या स्टॉकला 190 रुपयांना खरेदी करावे, पुढे यात 200 रुपयंपासून 210 रुपये लक्ष्य बघायला मिळेल. सुरक्षित गुंतणुकीसाठी 187 रुपयांवर स्टॉपलॉस लावावा असेही भसीन म्हणाले.

हेही वाचा: चिकन आणि अंड्यांच्या किमती पोहोचल्या चंद्रावर; का वाढतायत या किमती?

  • BUY - HERO MOTO @ 2765

  • SL 2715

  • TGT 2850

संजीव भसीन यांनी गुंतवणूकदारांना HERO MOTO चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा अत्यंत चांगला स्टॉक आहे जो सध्या अंडरपरफॉर्म करत आहे, पण पुढे याचा चांगला रिझल्ट येईल असे संजीव भसीन यांचे म्हणणे आहे. हा स्टॉक 100 रुपये वर आणि 20 रुपये खाली चांगला रिस्क रिवॉर्ड देत असल्याने हा स्टॉक खरेदी करायचा सल्ला त्यांनी दिला आहे. या स्टॉकला 2765 रुपयांवर खरेदी करावा यात पुढे 2850 चे लक्ष्य बघायला मिळेल.पण त्याचवेळी 2715 रुपयांवर स्टॉपलॉस लावावा असेही भसीन यांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top