भाजपचा विजय; शेअर मार्केट उसळलं..

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

सकाळी शेअआर मार्केट स्थिर होते, पण जशी मतमोजणीला सुरवात झाली व भाजपला कर्नाटकात आघाडी मिळाली, तसा शेअर बाजारातील सेन्सेक्स 256 अंकाच्या वाढीसह 35,812 वर पोहाचला, तर निफ्टी 58 च्या वाढीसह 10,865 वर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.  

मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निकडणूकीनंतर, आज (ता.15) निकाल समोर आल्यानंतर आणखी एका राज्यात जनमताचा कौल भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसतोय. मतमोजणीत भाजप हा सर्वात आघाडीवर आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आला. भाजपला कर्नाटकात आघाडी मिळताच शेअर मार्केटमध्ये उसळी पहायला मिळाली. 

कर्नाटक निवडणूकांच्या निकालामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही वाढ झालेली बघायला मिळत आहे. सकाळी शेअआर मार्केट स्थिर होते, पण जशी मतमोजणीला सुरवात झाली व भाजपला कर्नाटकात आघाडी मिळाली, तसा शेअर बाजारातील सेन्सेक्स 256 अंकाच्या वाढीसह 35,812 वर पोहाचला, तर निफ्टी 58 च्या वाढीसह 10,865 वर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.  

यापूर्वी कर्नाटकचा निकाल काय लागेल, याचा काही अंदाज नसल्याने गुंतवणूकदार सावध होते, त्यामुळे शेअर मार्केटही स्थिर होते. सोमवारी मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांकात 20 अंशांची वाढ होऊन तो 35 हजार 556 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर मार्केटचा निर्देशांक निफ्टी 10 हजार 806 अंशांवर स्थिर राहिला होता.

Web Title: Stock market rises due to success of bjp in karnataka