#stockmarket: भारतीय भांडवली बाजारात ऐतिहासिक वाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 17 November 2020

जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे भारतीय भांडवली बाजारात मोठी तेजी आली आहे.

मुंबई: जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे भारतीय भांडवली बाजारात मोठी तेजी आली आहे. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच भांडवली बाजार उच्चांकी पोहचला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीतील ही रेकॉर्ड ब्रेक वाढ ठरली आहे.  

ऐतिहासिक वाढ-
सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स 350 अंशांनी वाढून 44000 हजारांच्या वर गेला आहे. ही सेन्सेक्समधील वाढ ऐतिहासिक ठरली आहे. तर निफ्टीतील वाढही सुरुच असून तिथं 100 अंशांची वाढ होऊन निफ्टी 12880 अंशांपर्यंत गेला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे.

मॉडर्ना इफेक्ट-
आजच्या सत्रात बँक आणि धातूंच्या व्यवहारात मोठी तेजी दिसत आहे. सोमवारी मॉडर्ना या औषधनिर्मिती कंपनीने त्यांची कोरोनावरील लस प्रभावी ठरत असल्याचे जाहीर केले होते. ही लस 94.5 रुग्णांवर प्रभावी ठरली असल्याचे कंपनीने सांगितले होते. यामुळेच आज जगभरातील भांडवली बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसत आहे.

गॅस सिलिंडर बुक करताय? तर मग नक्की हे वाचा

यापुर्वी सोमवारी अमेरिकेतील भांडवली बाजार उच्चांकावर जाऊन बंद झाला होता. तर आजच्या सत्रात आशियाई भांडवली बाजारात त्याचा परिणाम दिसत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stock market share market Sensex and Nifty record break