शेअर बाजारातील घसरणीचे वारे थांबले 

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - शेअर बाजारात मागील पाच सत्रांत सुरू असलेले घसरणीचे वारे अखेर मंगळवारी थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५ अंशांनी वधारून ३४ हजार ६५१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २० अंशांची वाढ होऊन १० हजार ५३६ अंशांवर बंद झाला. 

अमेरिका आणि चीन यांच्या व्यापारी संबंधांतील तणाव कमी झाल्याने अमेरिकी शेअर बाजारामध्ये वाढ झाली. याचबरोबर आशियाई शेअर बाजारांमध्ये आज संमिश्र चित्र होते. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत ३५ अंशांची वाढ होऊन तो ३४ हजार ६५१ अंशांवर बंद झाला. 

Web Title: stock market stopped