esakal | शेअर मार्केटमध्ये 'या' शेअर्सने दिला तब्बल 600 टक्क्यांचा परतावा
sakal

बोलून बातमी शोधा

share market

शेअर मार्केटमध्ये 'या' शेअर्सने दिला तब्बल 600 टक्क्यांचा परतावा

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

मुंबई: मागील काही महिन्यांत शेअर मार्केटमध्ये मोठी वाढ दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीतही विक्रमी वाढ झाली आहे. राजरतन ग्लोबल वायर लिमिटेडच्या शेअरने (Rajratan Global Wire Limited) आपल्या भागधारकांना मागील 12 महिन्यांत 604 टक्के परतावा दिला आहे. 20 जुलै 2020 रोजी हा हिस्सा 250.55 रुपये होता. जो आज वाढून 1,764.95 रुपये झाला आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना मोठा नफा झाला आहे.

सेन्सेक्समध्येही (Sensex) मागील एका वर्षात 39.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षापुर्वी एक लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर त्याचे आज 7.04 लाख रुपये झाले आहेत. कंपनीने जूनच्या तिमाहीतील निकाल जाहीर केल्यानंतर BSE मध्ये आज स्टॉक 5 टक्क्यांनी वाढून 1764.95 रुपयांपर्यंत गेला आहे. गेल्या तीन महिन्यांत हा हे स्टॉक 110 टक्क्यांनी वाढले आहेत. तर या वर्षाच्या सुरूवातीपासूनच 304 टक्क्यांनी वाढ शेअर्स झाली आहे.

हेही वाचा: PHOTOS: मराठवाड्यातील नद्यांना पूर; वाहतूक बंद, पिकांचे नुकसान

MarketsMojo मते, कंपनीने मागील चार तिमाहीत सकारात्मक निकाल दाखवले आहेत. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला 21.92 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर 2020 जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत 1.65 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यावरून एका वर्षातील कंपनीची प्रचंड वाढ दिसून येतेय.

हेही वाचा: सामुदायिक जबाबदारीतून बाल विवाह रोखणे शक्य

राजरतन ग्लोबल वायरने तमिळनाडू राज्य सरकारबरोबर दक्षिण भारतात नवीन उत्पादन सुविधा स्थापनेसाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. कंपनीचा अमेरिका आणि युरोपमधील ग्राहक विस्तार वाढविण्याचा मानस आहे. भारतीय टायर कंपन्या उच्च क्षमतेच्या उपयोगात परत येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

loading image