शेअर बाजारात आतषबाजी सुरूच;  सेन्सेक्स पुन्हा 40 हजारी... 

वृत्तसंस्था
Wednesday, 30 October 2019

दिवाळीनंतर शेअर बाजारातील तेजी कायम आहे. सप्टेंबर तिमाहीत आघाडीच्या कंपन्यांकडून आलेले सकारात्मक तिमाही निकाल आणि इक्विटी करात बदल होण्याच्या अपेक्षेने भारतीय शेअर बाजारात दिवाळी सुरु आहे

मुंबई: दिवाळीनंतर शेअर बाजारातील तेजी कायम आहे. सप्टेंबर तिमाहीत आघाडीच्या कंपन्यांकडून आलेले सकारात्मक तिमाही निकाल आणि इक्विटी करात बदल होण्याच्या अपेक्षेने भारतीय शेअर बाजारात दिवाळी सुरु आहे. आज (बुधवार) दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्सने 200 - 300 अंशांची तेजी कायम ठेवत 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 342.29 अंशांनी वधारला असून तो 40 हजार 174 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये   91.6 अंशांची वाढ झाली आहे. तो 11 हजार 878.45 अंशांवर आहे. 

शेअर बाजारात सुरु असलेल्या तेजीला पाठबळ देणाऱ्या महत्वपूर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे :

1) आयसीआयसीआय सिक्युरिटीजनुसार,  इन्फोसिसने सादर केलेल्या माहितीनुसार 'बुक ऑफ अकॉउंटस'मध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. यानंतर कंपनीच्या शेअरने 3 टक्क्यांची उसळी घेत 671.40 वर पोचला होता.

2) टेलिकॉम कंपन्यांच्या समोर असलेल्या अडचणी समजून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच्या बातमीनंतर एअरटेलचा शेअर 2 टक्क्यांनी वधारून 371.35 वर पोचला होता.

3) फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा रेपो दरात घट करेल या अंदाजाने गुंतवणूक वाढली आहे.

4) खासगी तसेच सरकारी बँकाचे शेअर तेजीत असल्याने बँक निफ्टी देखील 30 हजारांच्या वर व्यवहार करत आहे.

5) याशिवाय आयटीसी, टीसीएस, एल अँड टी , बजाज ऑटो कंपन्या तेजीत व्यवहार करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stock market update IT shares gain Infosys rises over 2 pct