Share Market: बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये उत्साहवर्धक ओपनिंग; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 1 February 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM nirmala sitharaman) आज 11 वाजता बजेट सादर करणार आहेत

नवी दिल्ली Stock Market Update- अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM nirmala sitharaman) आज 11 वाजता बजेट सादर करणार आहेत. सामान्य जनतेपासून सर्वांचं लक्ष बजेटकडे लागलं आहे. गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. पण, बजेट सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्टेकमध्ये सकाळी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्स ट्रेंड करत आहेत. सेन्सेक्समध्ये जवळपास 440 अंकाची तेजी पाहायला मिळाली असून 46,728.83 वर ट्रेंड होत आहे. याशिवाय निफ्टी इंडेक्स 130 अंकाच्या वाढीसह 13750 वर आला आहे. 

कृषीमंत्र्यांनी तरी जनतेला सत्य सांगावं; शरद पवारांचा मोदी सरकारला टोला

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक बुस्टरमुळे शेअर मार्केटलाही दिशा मिळण्याची शक्यता आहे. आज टॉप टेन गेनर्स शेअर्समध्ये सेन्सेक्सचे 30 पैकी 7 स्टॉक्स लाल रंगात आहेत. याशिवाय 23 स्टॉक्स तेजीत आहेत. इंडसइंड बँक 6.16 टक्क्यांच्या तेजीसह टॉप गेनर्सच्या यादीमध्ये आहे. याशिवाय ICICI Bank, Titan, HDFC, SBI, LT, HDFC Bank, Reliance, ONGC, Maruti, Sun Pharma, ITC, Bajaj Finance, Bharti AIrtel मध्ये तेजीने व्यवसाय होत आहे. 

Budget 2021 Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली राष्ट्रपतींशी...

प्री ओपनींगवेळी सेंसेक्स 177.39 अंकाच्या वाढीसह 46,463.16 लेवलवर आला होता. तर निफ्टी 89.70 अंकांच्या तेजीसह 13,724.30 लेवलवर आला आहे. अमेरिकी मार्केटमध्ये शुक्रवारी 2 टक्क्यांपेक्षा जास्तीच्या घसरणीसह आज Dow Futures मध्ये 230 अंकाची रिकव्हरी पाहायला मिळाली. याशिवाय आशियायी मार्केटमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली, पण SGX NIFTY मध्ये जवळपास अर्धा टक्के घसरण झाली आहे. 

GST ची रिकॉर्ड कमाई

सोमवारी बजेट सादर होण्यापूर्वीच अर्थव्यवस्थेविषयी चांगली बातमी मिळाली होती. जानेवारी महिन्यात GST ची रिकॉर्ड तोड कमाई झाली आहे. जानेवारीमधील जीएसटी कलेक्शन 1.20 लाख कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stock Market Update sensex nse nifty FM nirmala sitharaman union budget 2021