शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण

Share-Market
Share-Market

मुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज ३६५ अंशांचे चढ-उतार झाले. अखेर तो किरकोळ २ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १४१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ६ अंशांची घट होऊन १० हजार ५७६ अंशांवर बंद झाला. 

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने सेन्सेक्‍स आज ३५ हजार ३५१ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. त्यानंतर आशियाई शेअर बाजारांमधील घसरण आणि युरोपीय शेअर बाजारांमध्ये सत्राच्या सुरवातीला झालेली पडझड यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सेन्सेक्‍स ३४ हजार ९८६ या दिवसभरातील नीचांकी पातळीवर घसरला. अखेर तो किरकोळ २ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १४१ अंशांवर बंद झाला. मागील सत्रात निर्देशांकात ३३२ अंशांची वाढ झाली होती. खरेदी आणि विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्‍समध्ये आज ३६५ अंशांचे चढ-उतार पाहायला मिळाले. 

औषधे, आयटी कंपन्यांना फटका 
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना फटका बसला. आज सन फार्मा, कोटक बॅंक, टीसीएस, एम अँड एम, इन्फोसिस, टाटा मोटर्स आणि येस बॅंक यांच्या समभागात ७.३६ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. मारुती, ओएनजीसी, एशियन पेंट्‌स, एसबीआय, इंड्‌सइंड बॅंक, एचयूएल आणि आयसीआयसीआय बॅंक यांच्या समभागात २.८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com