शेअर बाजारात तेजीचे वारे

पीटीआय
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई -: शेअर बाजारातील तेजीचे वारे सलग आठव्या सत्रात सोमवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११२ अंशांनी वधारून ३४ हजार ३०५ अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४७ अंशांनी वाढून १० हजार ५२८ अंशांवर बंद झाला. 

घाऊक चलनवाढ मार्चमध्ये मंदावली असून, औद्योगिक उत्पादनातील वाढ आणि किरकोळ चलनवाढीतील घसरण यामुळे गुंतवणूकदारंमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मात्र, अमेरिकेने सीरियावर केलेल्या कारवाईमुळे जागतिक पातळीवर तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. नफेखोरीमुळे सेन्सेक्‍स आज ३४ हजार अंशांखाली घसरला. नंतर त्यात वाढ होऊन तो मागील सत्राच्या तुलनेत ११२ अंशांनी वाढून ३४ हजार ३०५ अंशांवर बंद झाला. 

आठ सत्रांतील वाढ  
सेन्सेक्‍स :  १,२८६
निफ्टी :  ४००

Web Title: Stock markets rally fastest