बॅंकिंग कामकाजावर संपाचा प्रभाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

मुंबई - प्रमुख कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी (ता. ८) राज्यातील बॅंकिंग व्यवहार प्रभावित झाले. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन आणि बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांचे प्राबल्य असलेल्या सिंडिकेट, कॅनरा, कॉर्पोरेशन, विजया, देनासारख्या २१ बॅंका, सहा खासगी आणि चार विदेशी बॅंकांच्या सहा हजार शाखांमधून जवळपास ३० हजार कर्मचारी संपात उतरले. यामुळे कोट्यवधींचे धनादेश वटण्याच्या प्रक्रिया ठप्प झाली. 

नोकर भरती, वेतन, बॅंक खासगीकरण आणि विलीनीकरणाल विरोध करत हजारो कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात रॅली काढली. पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी या शहरांमध्ये बॅंक कर्मचाऱ्यांनी रॅली काढून आंदोलन केल्याचे महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले. 

संपाचा प्रभाव
रिझर्व्ह बॅंक, नाबार्ड, एक्‍झिम बॅंक, एलआयसी, जीआयसी, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, सिंडिकेट, कॅनरा, कॉर्पोरेशन, देनासह इतर सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर संपाचा परिणाम जाणवला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strike Effect on banking Work