अनुदानित सिलिंडरच्या दरात पावणेदोन रुपयाची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - अनुदानित सिलिंडरच्या दरात आज १ रुपया ७६ पैशांची वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. आधार किमतीवरील करात बदल झाल्याने ही वाढ करण्यात आल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) सांगण्यात आले. नव्या दरवाढीमुळे आता दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत ४९८.०२ रुपये झाली असून, सध्या ती ४९६.२६ रुपये होती. तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेस सिलिंडरच्या आधार किमतीत बदल करतात. त्यानुसार विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत ३५.५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीतील ग्राहकांना एका सिलिंडरसाठी आता ७८९.५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Web Title: subsidy cylinder rate increase