सन फार्माच्या शेअरने गाठला 44 महिन्यांचा नीचांक

Sun Pharma's stock plunged by 44-month low
Sun Pharma's stock plunged by 44-month low

मुंबई: टेक महिंद्रा, रिलायन्स कम्युनिकेशन्सप्रमाणेच तिमाही निकालांच्या घोषणेनंतर 'सन फार्मा'च्या शेअरमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरने मुंबई शेअर बाजारात 493 रुपयांवर 52 आठवड्यांचा तसेच 44 महिन्यांचा नीचांक गाठला आहे. गेल्या आठवड्यामध्ये कंपनीच्या शेअरमध्ये सुरु झालेली घसरण निराशाजनक तिमाही निकालांमुळेदेखील कायम आहे. कंपनीच्या शेअरमध्ये मागील आठवडाभरात सुमारे 24 टक्क्यांची घसरण झाली आहे.

औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी असणाऱ्या सन फार्माला मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 1,223.71 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात 13.59 टक्क्यांची घसरण झाली. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर 3.5 रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्चदरम्यान कंपनीने एकुण 6,825.16 कोटी रुपयांची विक्री केली आहे. मात्र, गेल्या संपुर्ण आर्थिक वर्षात कंपनीला 6,964 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यात 53 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीचे कार्यान्वयन उत्पन्न 30,264 कोटी रुपयांवर पोचले आहे.

मुंबई शेअर बाजारात सध्या(12 वाजून 30 मिनिटे) सन फार्माचा शेअर 509.30 रुपयांवर व्यवहार करत असून 59.25 रुपये अर्थात 10.42 टक्क्यांनी घसरला आहे. एक रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने 493.00 रुपयांची नीचांकी तर 854.50 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 121,716.04 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com