सन टीव्हीच्या शेअरचा चढता आलेख कायम

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई: सन टीव्हीचे प्रवर्तक कलानिधी मारन आणि त्यांचे बंधू व माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि अन्य एकाला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) विशेष न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर सन टीव्ही नेटवर्कच्या शेअरमध्ये निर्माण झालेली तेजी आजदेखील(सोमवार) कायम आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 719 रुपयांवर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे.
मारन यांच्यावर मनी लाँडरिंगमधील सहभागाचा आरोप झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांपासून अस्थिरता होती. याशिवाय, कंपनीच्या इतर कामकाजासंदर्भातील समस्यांचादेखील शेअरवर परिणाम झाला होता.

मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची 698 रुपयांवर सुरुवात झाली. त्यानंतर, मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 684.90 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 717.95 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 684.30 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 719 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली.
मुंबई शेअर बाजारात सध्या(11 वाजून 48 मिनिटे) कंपनीचा शेअर 686.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा शेअर 0.34 टक्के वाढीसह 685.65 रुपयांवर व्यवहार करत आहे.

Web Title: sun tv share graph growth