वाहनावरील स्टिकरचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - वाहनांमध्ये कोणत्या प्रकारचे इंधन आहे, हे ओळखण्यासाठी होलोग्राम स्टिकर लावण्याबाबत रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाने समोर ठेवलेला प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. दिल्लीमध्ये (एनसीआर) ३० सप्टेंबरपर्यंत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 

वाहनांमधील इंधनाचा स्रोत ओळखण्यासाठी पेट्रोल व सीएनजी वाहनांसाठी फिक्कट निळ्या रंगाचा तसेच, डिझेल वाहनांसाठी नारंगी रंगाचा होलोग्राम स्टिकर लावण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाने आज न्यायालयात दिली. इलेक्‍ट्रिक, हायब्रिड वाहनांसाठी नंबरप्लेटचा रंग हिरवा ठेवण्याबाबत विचार करावा, असेही न्यायालयाने सूचित केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Supreme Court has accepted the proposal on the vehicle's sticker