‘सुझलॉन’च्या शेअरमध्ये तेजी का?

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई: सुझलॉन एनर्जीच्या शेअरने आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात 3.6 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. कंपनीने पुन्हा एकदा 50.40 मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे कंत्राट मिळाल्याची घोषणा केली आहे.

याअंतर्गत सुझलॉनतर्फे 2.1 मेगावॅट क्षमता असलेल्या एस97 120एम हायब्रिड टॉवरच्या 24 युनिट्सची स्थापना केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मार्च 2017 पर्यंत पुर्ण केले जाणार आहे. संपुर्ण प्रकल्पाचे काम टर्नकी आधारावर करण्यात येणार असून सुरुवातीच्या 14 वर्षांसाठी कार्यान्वयन व देखभालीच्या सेवादेखील पुरविल्या जाणार आहेत.

मुंबई शेअर बाजारात सुझलॉनचा शेअर आज(सोमवार) 17.46 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 17.46 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 17.97 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या(11 वाजून 53 मिनिटे) कंपनीचा शेअर 17.65 रुपयांवर व्यवहार करत असून 1.73 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: suzlon share up now?