'टाटा'ने प्रीमियम हॅचबॅग सेगमेंटमध्ये आणली 'ही' कार 

Tata Altroz launched in India
Tata Altroz launched in India

पुणे: प्रीमियम हॅचबॅक श्रेणीमध्ये प्रवेश करत टाटा मोटर्सने सोमवारी अ‍ॅल्ट्रोझ लाँच केली. नवीन एएलएफए शैलीमध्ये विकसित केलेली अॅल्‍ट्रोझ हे पहिले वाहन आहे आणि इम्‍पॅक्ट २.० डिझाइन लँग्वेज दाखवणारे दुसरे वाहन आहे. आकर्षक डिझाईन, बाजारातील पहिल्यांदा सादर होणार्‍या वैशिष्ट्यांसह आणि अलीकडेच जागतिक एनसीएपीचे ५-स्टार मानांकन मिळवणार्‍या या वाहनामध्ये सुरक्षा, डिझाइन, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे  ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यास सज्ज आहे. 

टाटा मोटर्सचे मुख्‍य तंत्रज्ञान अधिकारी राजेंद्र पेटकर म्‍हणाले, ''आम्‍हाला आमची प्रिमिअम हॅचबॅक 'अॅल्‍ट्रोझ'च्‍या सादरीकरणाची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्‍हाला अॅल्‍ट्रोझ या उत्‍पादनाचा अभिमान आहे. ही दुसरी टाटा, तसेच भारतीय कार आहे, जिला ५-स्‍टार ग्‍लोबल 'एनसीएपी रेटिंग' मिळाले आहे. हे उत्‍पादन आमच्‍या ग्राहकांना सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्‍यासोबत आम्‍ही प्रिमिअम हॅचबॅक विभागामध्‍ये प्रवेश करत असताना नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करेल.''

५ स्‍टार ग्‍लोबल रेटिंग
अॅल्‍ट्रोझला ५ स्‍टार ग्‍लोबल एनसीएपी रेटिंगकडून सुरक्षिततेमध्‍ये सुवर्ण मानक मिळाले आहे. या कारमध्‍ये प्रगत एएलएफए रचना, एबीएस, ईबीडी व सीएससी आणि ड्युअल एअरबॅग्‍ज अशी सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्‍ट्ये आहेत. ही व्‍यापक सुरक्षा यंत्रणा, तसेच एनर्जी अॅब्‍झॉर्बिंग एएलएफए रचना टाटा अॅल्‍ट्रोझच्‍या प्रवाशांना जागतिक दर्जाची सुरक्षितता मिळण्‍याची खात्री देतात.

डिझाइन
इम्‍पॅक्‍ट २.० डिझाइन तत्त्‍वावर आधारित असलेल्‍या अॅल्‍ट्रोझचे  डिझाइन आहे. तसेच ९० अंश कोनामध्‍ये उघडणारे दरवाजे असल्याने प्रवाशांना वाहनाच्‍या आत-बाहेर येण्‍यासाठी पुरेशी जागा मिळत . लेझर कट अलॉय व्‍हील्‍स आणि इंटीरिअर्समधील प्रिमिअम ब्‍लॅक पियानो फिनिश देण्यात आली आहे. 

तंत्रज्ञान
१७.७८ सेमी टचस्क्रिन हर्मन इन्‍फोटेन्‍मेंट आणि दर्जात्‍मक आकर्षकता असलेल्‍या अॅल्‍ट्रोझमध्‍ये वॉइस कमांड रेकग्निशन, अॅप्‍पल कार प्‍ले, अँड्रॉईड ऑटो आणि टर्न-बाय-टर्न फिचर अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

ड्रायव्हिंग डायनॅमिक्‍स
शक्तिशाली पेट्रोल व डिझेल इंजिनांसह उत्तम सस्‍पेंशन असलेली अॅल्‍ट्रोझ ग्राहकाला डायनॅमिक ड्रायव्हिंग अनुभव देते. क्रूझ कंट्रोल वैशिष्‍ट्यासह मल्‍टीड्राइव्‍ह मोड्स देण्यात आले आहे. 

किंमत: 
अ‍ॅल्ट्रोझ पेट्रोल आवृत्तीमध्ये ५.२९ लाख रुपये आणि डिझेल आवृत्तीमध्ये ६.९९ लाख रुपयांच्या आरंभिक किंमतींमध्ये पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com