टाटा केमिकल्स मिस्त्रींच्या पाठीशी

पीटीआय
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई - टाटा केमिकल्सच्या स्वतंत्र संचालकांनी सायरस मिस्त्री यांना बिनविरोध पाठिंबा दिला असून, व्यवस्थापनावर पूर्ण विश्‍वास दर्शविला आहे. 

मुंबई - टाटा केमिकल्सच्या स्वतंत्र संचालकांनी सायरस मिस्त्री यांना बिनविरोध पाठिंबा दिला असून, व्यवस्थापनावर पूर्ण विश्‍वास दर्शविला आहे. 

इंडियन हॉटेल्सनंतर आता मिस्त्री यांना टाटा केमिकल्सच्या स्वतंत्र संचालकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा केमिकल्सने म्हटले आहे, की कंपनीत टाटा सन्सचा १९.३५ टक्के हिस्सा आहे. आज झालेल्या बैठकीत स्वतंत्र संचालकांनी अध्यक्ष आणि व्यवस्थापन मंडळावर पूर्ण विश्‍वास दर्शविला. मिस्त्री हे टाटा केमिकल्सचे अध्यक्ष आहेत. कंपनीच्या स्वतंत्र संचालकात वाडिया समूहाचे अध्यक्ष नुस्ली वाडिया, डीसीबी बॅंकेचे अध्यक्ष नसीर मुनजी, नाबार्डचे माजी अध्यक्ष वाय. एस. पी. थोरात आणि विभा पॉल रुशी यांचा समावेश आहे.

Web Title: Tata Chemicals support with cyrus mistry