TATA groups
TATA groupsesakal

TATA Group चा शेअर 52 आठवड्यांच्या उंचीवर! 1 वर्षात 200 टक्के पेक्षा जास्त रिटर्न

या शेअरमध्ये आजच्या दिवसात 6 टक्क्यांचा परतावा दिसला.
Summary

या शेअरमध्ये आजच्या दिवसात 6 टक्क्यांचा परतावा दिसला.

टाटा ग्रुपच्या (Tata Group) शेअर्सने (Shares) गुंतवणुकदारांचा कायमच फायदा करुन दिला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना नेहमीच या शेअर्सवर विश्वास वाटत आला आहे. अलीकडेच, टाटा समूहाचा शेअर Tata Elxsi ने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. या शेअरने शुक्रवार आणि सोमवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, शिवाय गेल्या वर्षभरात 200 टक्क्यांहून अधिक परतावाही दिला आहे.

TATA groups
TATA Group : 'या' शेअर्सने एका वर्षात दिला छप्परफाड 1000 टक्के परतावा

52 आठवड्यांचा उच्चांक

सोमवारी दुपारी Tata Elxsi 8,935.20 च्या पातळीवर व्यवहार करत होता. पण आजच्या सत्रात हा शेअर 9,078.00 च्या पातळीवरही पोहोचला. या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर करेक्शन दिसली. या शेअरमध्ये आजच्या दिवसात 6 टक्क्यांचा परतावा दिसला.

1 वर्षात 232 टक्के परतावा

Tata Alexi Limited ने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 232 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 31 मार्च 2021 रोजी हा स्टॉक 2693 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता, जो आता 25 मार्च रोजी 8,950.70 रुपयांवर पातळीवर गेला.

TATA groups
Tata Group च्या या शेअर्समध्ये एका वर्षात मिळेल 39 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा

मार्केट तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ?

मार्केट तज्ज्ञ विकास सेठी यांनी टाटा अलेक्सीचे शेअर्स होल्ड (HOLD) करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकची कामगिरी चांगली आहे, पण सध्याच्या बाजारात हा स्टॉक थोडा महाग दिसत आहे. पण, लाँग टर्मसाठी या स्टॉककडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स असतील तर तुम्ही होल्ड करु शकता. दुसरीकडे, तुम्हाला लाँग टर्मसाठी पैसे गुंतवायचे असतील तरच गुंतवणूक करा असा सल्लाही त्यांनी दिला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com