esakal | 'तनिष्क'ची नवी कर्णआभूषणे; स्टनिंग एव्हरी इयर
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Tanishq

'तनिष्क'ची नवी कर्णआभूषणे; स्टनिंग एव्हरी इयर

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : टाटा समूहाच्या (Tata Group) तनिष्क तर्फे (Tanishka) नव्या पद्धतीच्या कर्णआभूषणांची (Earrings design) डिझाईन `स्टनिंग एव्हरी इयर` आज बाजारात आणली गेली. अभिनेत्री मीरा कपूर (meera kapoor) हिच्या हस्ते या कर्णआभूषणांचे अनावरण करण्यात आले. तनिष्कच्या अंधेरी येथील अवाढव्य स्टोअर मध्ये (Andheri shops) आज हा कार्यक्रम झाला. यावेळी तनिष्क-टायटनच्या सरव्यवस्थापक (मार्केटिंग) रंजनी कृष्णास्वामी (Ranjani krushnaswami) उपस्थित होत्या. घरी, ऑफिसात, सणाच्या दिवशी, पार्टिमध्ये, समारंभात, धार्मिक कार्यक्रमात अशा वेगवेगळ्या प्रसंगात परिधान करण्यासाठी 29 प्रकारच्या या कर्णआभूषणांची वेगवेगळी अशी सुमारे दोन हजार डिझाईन तनिष्कने बाजारात आणली आहेत.

हेही वाचा: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी लादणे थांबवा; मराठी एकीकरण समितीचा निषेध

देशातील 360 पेक्षाही जास्त तनिष्का स्टोअर मध्ये ही कर्णआभूषणे मिळतील. सोने, हिरे, प्लॅटिनम आदींच्या साह्याने तयार केलेली ही कर्णआभूषणे परंपरागत पद्धतीची तसेच नव्या पिढीला आवडतील अशा नाजुक डिझाईनची देखील आहेत. दागिने हे आपल्या व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग आहेत, असे मानणाऱ्या स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेऊन हे दागिने घडविण्यात आले आहेत. किंबहुना प्रत्येक दागिन्यालाही आपले स्वतंत्र व्यक्तीमत्व असते.

ही कर्णआभूषणे महिलांना रोजच विशेष अनुभव देतील, असेही श्रीमती रंजनी म्हणाल्या. तर हल्लीच्या मुलींना पिटुकल्या कर्णआभूषणांची भलतीच क्रेझ असते. आपल्यालाही तनिष्क ची डिझाईन नेहमीच आवडत आली असून ही नवी डिझाईन देखील भारतीय महिलांप्रमाणेच आगळीवेगळी आहेत, असे अभिनेत्री मीरा कपूर हिने सांगितले.

loading image
go to top