टाटांची नवी कार; 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

नवी दिल्ली: टाटा मोटर्स पुन्हा एकदा प्रत्येकाच्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणणार आहे. टाटा मोटर्स लवकरच स्वप्नवत वाटणारी नवीन कार सादर करणार असून 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार आहे. टाटांनी 82 व्या जिनिव्हा मोटर शोमध्ये 'मेगापिक्सल' सादर केली होती.

चार लोकांना घेऊन जाण्याची क्षमता असलेली ही कार पर्यावरणास अनुकूल अशा पद्धतीची आहे. हायब्रिड पद्धतीची असलेली या कारची बॅटरी एकदा चार्ज केल्यास 87 किलोमीटर धावणार आहे. शिवाय याची बॅटरी घरी देखील चार्ज करता येणार आहे. नॅनो प्रमाणेच सर्वांना कमी इंधनात अधिक अंतर पार करता यावे यासाठी टाटाने 'मेगापिक्सल'च्या रूपात नवीन कार कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटाची बहुचर्चित कार या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र टाटाकडून अजुन कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र कमी इंधनात जास्त अंतर कापणारी कार भारतीयांना कमी किंमतीत लवकर उपलब्ध करून देण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न आहे.

Web Title: Tata Megapixel