टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 11 टक्के घसरण…

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई : टाटा मोटर्सने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत. तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात 96.22 टक्के घसरण होऊन तो 111.57 कोटी रुपयांवर आला आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा शेअर सकाळच्या सत्रात 11 टक्क्यांनी घसरला. शेअरने 441.25 रुपयांची नीचांकी पातळी गाठली.

देशांतर्गत उत्पादन प्रकल्पांमधील तोटा आणि ब्रिटिश उपकंपनी "जेएलआर'चा कमी झालेला नफा याला कारणीभूत ठरला आहे. नोटाबंदीमुळे वाहनांची विक्री कमी झाल्याने कंपनीच्या नफ्यात घसरण झाली.

टाटा मोटर्सच्या मागील आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत 2 हजार 952 कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री 2.2 टक्‍क्‍याने कमी होऊन 67, 864 कोटी रुपयांवर आली आहे. मागील आर्थिक वर्षातील याच काळात ती 69 हजार 398 कोटी रुपये होती. मागील आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 137 कोटी रुपये होता. तो आता 1 हजार 046 कोटी रुपये करासह आहे. तिमाहीत टाटा मोटर्सचा महसूल 1 हजार 167 कोटी रुपये असून, त्याआधीचा वर्षातील या तिमाहीत तो 10 हजार 19 कोटी रुपये होता. यात 1.47 टक्के वाढ झाली आहे.

नोटाबंदीमुळे टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत तिसऱ्या तिमाहीत घसरण झाली आहे. मध्यम आणि जड वाहनांच्या विक्रीत 9 टक्के घट तर हलक्‍या वजनाच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत काहीच वाढ नोंदविण्यात आलेली नाही. प्रवासी वाहनांच्या विक्रीत 25.4 टक्के वाढ झाली असून, यात मोटारींच्या विक्रीतील वाढ 31.1 टक्के आहे. मोटारींच्या विक्रीत वाढ होण्यास तियागोला मिळणारा चांगला प्रतिसाद कारणीभूत ठरला आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा शेअर 446.30 रुपयांवर व्यवहार करत 40.50 रुपयांच्या म्हणजेच 8.32 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झालला.

Web Title: Tata moter shares 11% down