"टाटा मोटर्स'चा इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी करार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने व्यावसायिक इलेक्‍ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील "लिथिअम अर्बन टेक्‍नोलॉजी'बरोबर करार केला आहे. प्रवासी वाहने, सार्वजनिक क्षेत्रातील वाहने आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा करार करण्यात आला आहे.

या करारानुसार टाटा मोटर्स चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 400 इलेक्‍ट्रिक टिगोर वाहने "लिथिअम अर्बन'ला पुरवणार आहे. त्याचबरोबर या कराराअंतर्गत नव्या 100 नेक्‍सन ईव्ही गाड्यासुद्धा पुरवल्या जाणार आहेत. टाटा मोटर्सच्या इलेक्‍ट्रिक वाहन व्यवसाय आणि कॉर्पोरेट धोरणाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले, "हा फक्त टाटा मोटर्सच्या इलेक्‍ट्रिक वाहनांच्या व्यवसायातील मैलाचा दगड नसून इलेक्‍ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेला कलाटणी देणारा आहे.

टाटा मोटर्सबरोबरच्या करारामुळे प्रवासी वाहने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मालवाहतुकीच्या क्षेत्रात नवे बदल घडून येतील, असे मत "लिथिअम अर्बन टेक्‍नॉलॉजी'चे संस्थापक संजय कृष्णन यांनी व्यक्त केले आहे. 

web title : Tata Motors' contract for electric vehicles

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Motors' contract for electric vehicles