टाटा मोटर्स करणार रु.500 कोटींच्या कर्जरोख्यांची विक्री

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नवी दिल्ली: टाटा मोटर्सने अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या(एनसीडीज्) विक्रीतून 500 कोटी रुपयांपर्यंत भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, खासगी गुंतवणूकदारांना 7.84 टक्के कूपन दराने सुमारे 5,000 कर्जरोख्याचे वाटप केले जाणार आहे. हे कर्जरोखे विमोचनीय, असुरक्षित आणि अपरिवर्तनीय असतील.

सध्या(12 वाजून 6 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा शेअर 472.00 रुपयांवर व्यवहार करत असून तो 0.04 टक्क्याने वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 266.00 रुपयांची नीचांकी तर 598.60 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु. 160,276.11 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Tata Motors to raise Rs 500 cr via NCDs