'टाटा स्टील'मधूनही मिस्त्रींची हकालपट्टी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

मुंबई: कोरसच्या अधिग्रहणाबाबत आरोप करणाऱ्या सायरस मिस्त्रींची शुक्रवारी (ता.25) "टाटा स्टील'च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत मिस्त्रींचे समर्थक असलेल्या नुस्ली वाडियांचा विरोध डावलत हा ठराव मंजूर करण्यात आला.

मुंबई: कोरसच्या अधिग्रहणाबाबत आरोप करणाऱ्या सायरस मिस्त्रींची शुक्रवारी (ता.25) "टाटा स्टील'च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत मिस्त्रींचे समर्थक असलेल्या नुस्ली वाडियांचा विरोध डावलत हा ठराव मंजूर करण्यात आला.

मिस्त्रींऐवजी ओ. पी. भट यापुढे टाटा स्टीलचे नवे अध्यक्ष राहतील, असे कंपनीने म्हटले आहे. टाटा सन्समधून पदच्यूत केल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मिस्त्रींना टाटा स्टीलच्या रूपाने चौथी कंपनी गमवावी लागली आहे. दरम्यान, मिस्त्रींची कोंडी करण्यासाठी टाटा सन्सकडून आणखी काही झटके दिले जाण्याची शक्‍यता आहे. टाटांचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये आज टाटा स्टीलच्या संचालकांची बैठक झाली. यात सहा संचालकांनी मिस्त्रींना हटवण्याच्या ठरावाला होकार दिला; तर नुस्ली वाडियांसह आणखी दोन स्वतंत्र संचालकांनी विरोध केला. मात्र मिस्त्रींच्या हकालपट्टीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. येत्या 21 डिसेंबर होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे हा ठराव मांडला जाणार आहे. भट यांचा टाटा स्टीलमध्ये 10 जून 2013 रोजी स्वतंत्र संचालक म्हणून समावेश करण्यात आला होता. भट टीसीएसच्या संचालक मंडळावर आहेत. याआधी टीसीएस,"टाटा मोटर्स' आणि "टीजीबीएल'मधून मिस्त्रींची हकालपट्टी करण्यात आली आहे.

ठरावाची प्रत मिळालीच नाही
मिस्त्री, नुस्ली वाडिया आणि सुबोध भार्गव या तिघांना बैठकीपूर्वी ठरावाची प्रत मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

 

Web Title: Tata Steel removes Cyrus Mistry as chairman, OP Bhatt takes his place