ब्रिटनमधील पेन्शन फंड टाटा स्टील करणार बंद?

पीटीआय
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

लंडन - ब्रिटनमधील पोलाद उद्योगातील संकटामुळे अडचणीत सापडलेल्या टाटा स्टीलकडून तुटीत चाललेला पेन्शन फंड बंद करण्यात येण्याची शक्‍यता प्रसारमाध्यमांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

टाटा स्टील ब्रिटनमधील १५ अब्ज पौंडची ‘ब्रिटिश स्टील पेन्शन’ योजना बंद करण्याच्या तयारी आहे. यातील तूट वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत सहा कोटी पौंड देऊन बंद करण्याची अंतिम मुदत असेल. याबाबतची अधिकृत घोषणा करण्याआधी साठ दिवसांची चर्चा करणे कायदेशीररीत्या आवश्‍यक आहे. त्यामुळे ही योजना या महिनाअखेर बंद होईल, असे एक वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

Web Title: Tata Steel will close the UK pension fund?

टॅग्स