गुंतवणुकीचा 'करमुक्त' पर्याय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत.

सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत वर्गीकरण करू शकतो- इक्विटी आणि डेट फंड.

या दोघांची तुलना करता इक्विटी फंडामध्ये जोखीम जास्त असते. या फंडामध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते- एकरकमी आणि सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). साधारणतः म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना मागील कामगिरी बघून गुंतवणूक करण्याची मानसिकता आपणास दिसते. पण आपण हे विसरून जातो, की भूतकाळात जी कामगिरी झालेली आहे, तशीच ती भविष्यात होईल, याची खात्री नसते. यामुळे गुंतवणूक करताना आपली नक्की गरज व जोखीम या गोष्टींचा विचार करून मगच गुंतवणूक करावी, असा सल्ला मी देईन. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक केल्यास ती करमुक्त होते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पारदर्शी व लवचिकही असते.

पुढील प्रकारचे म्युच्युअल फंड आता बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात आपण आपल्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकतो.

फंड प्रकार 1) कमी जोखीम ः प्रथमच गुंतवणूक करणारे, ज्येष्ठ नागरिक, मुदत ठेवींसारखा (एफडी) सुरक्षित परतावा अपेक्षिणाऱ्यांसाठी योग्य.
अ) इक्विटी सेविंग्ज स्कीम ः गुंतवणूक 3 ते 5 वर्षे. फंड ऍलोकेशन- इक्विटी (लार्ज कॅप) 33 टक्के, डेट 33 टक्के व 33 टक्के आर्बिट्राज
ब) बॅलन्स्ड फंड ः गुंतवणूक 5 ते 10 वर्षे, इक्विटी (लार्ज कॅप) 65 टक्के, डेट 35 टक्के (मासिक, नियमित उत्पन्नासाठी चांगला).

फंड प्रकार 2) मध्यम जोखीम ः वय 50 पर्यंतची व्यक्ती, प्रथमच गुंतवणूक करणारे, मध्यम जोखीम पत्करण्याची तयारी, उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणारी व्यक्ती.
अ) लार्ज कॅप फंड ः गुंतवणूक 5 ते 10 वर्षे. फंड ऍलोकेशन- लार्ज कॅप 80 टक्के
ब) डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे. फंड ऍलोकेशन- लार्ज कॅप+मिड कॅप+स्मॉल कॅप.

फंड प्रकार 3) उच्च जोखीम ः वय 40 पर्यंतची व्यक्ती, प्रथमच गुंतवणूक करणारे, अधिक जोखीम पत्करण्याची तयारी, उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणारी व्यक्ती, थेट इक्विटी गुंतवणूकदार.
अ) मिड कॅप फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे. फंड ऍलोकेशन- मिड कॅप 65 टक्‍क्‍यांवर आणि बाकी लार्ज कॅप. हा फंड "ऍग्रेसिव्ह' असल्याने पोर्टफोलिओच्या 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुंतवणूक यात नसावी. "एसआयपी' करणे योग्य.
ब) स्मॉल कॅप फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे. फंड ऍलोकेशन- स्मॉल कॅप 50 टक्के आणि बाकी लार्ज कॅप+मिड कॅप.

फंड प्रकार 4) ऍग्रेसिव्ह रिस्क ः वय 40 पर्यंतची व्यक्ती, थेट इक्विटी गुंतवणूकदार, ज्यांना सेक्‍टरची व्यवस्थित माहिती आहे. (प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या फंडात गुंतवणूक करू नये.)
अ) थिमॅटिक फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे. फंड ऍलोकेशन- फोकस्ड 3 ते 4 सेक्‍टर.
ब) सेक्‍टोरल फंड ः "सेक्‍टर सायकल'वर गुंतवणूक कालावधी अवलंबून. फंड ऍलोकेशन- इक्विटी 65 टक्के, त्यापेक्षा अधिक (सिंगल सेक्‍टर), बाकी लार्ज कॅप.

फंड प्रकार 5) टॅक्‍स सेव्हिंग ः करबचतीसाठी उपयोगी, पीपीएफ गुंतवणूकदार, रिटायरमेंट प्लॅनिंग, तीन वर्षे लॉक-इन-पिरियड.
अ) इएलएसएस फंड ः गुंतवणूक 5 वर्षे, फंड ऍलोकेशन- इक्विटी 85-90 टक्के (लार्ज कॅप 65 टक्के, मिड कॅप 30-35 टक्के). कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांची करबचत.

Web Title: tax free investment options