कर बुडवणाऱ्यांची नावे जाहीर 

पीटीआय
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने देशभरातील २४ बड्या करबुडव्यांची नावे गुरुवारी जाहीर केली. तब्बल ४९० कोटी रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी ‘नेम अँड शेम डिफॉल्टर’ धोरणाअंतर्गत प्राप्तिकर विभागाने करबुडवे व्यक्ती आणि कंपन्यांची नावे वृत्तपत्रांमध्ये जाहीर केली आहेत. यातील काहीजण बेपत्ता असून, काहींनी थकीत कर भरण्यास असमर्थता दर्शवल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

दिल्लीतील मेसर्स स्टॉकगुरू इंडिया या कंपनीने सर्वाधिक ८६.२७ कोटींचा कर थकवला आहे. या कंपनीचा मालक लोकेश्‍वर देव बेपत्ता आहे. कोलकत्यातील अर्जुन सोलकर याने ५१.३७ कोटींचा कर थकवला आहे. याच शहरातील किशन शर्मा याने ४७.५२ कोटींचा कर बुडवला आहे. कर बुडवणाऱ्यांच्या यादीत बुलियन ट्रेडिंग, अन्नप्रक्रिया उद्योग, बांधकाम, मद्यनिर्मिती क्षेत्रातील उद्योजकांचा समावेश आहे. अहमदाबाद, गुवाहाटी, नाशिक, विजयवाडा, बडोदा, कोलकता या शहरातील उद्योजक आणि वैयक्‍तिक करदात्यांचा यात समावेश आहे. यादीत करबुडव्यांची माहिती, कंपनीची नावे, पॅनक्रमांक, पत्ता या माहितीचा समावेश आहे. यापूर्वी प्राप्तिकर खात्याने ९६ करबुडव्यांची नावे जाहीर केली आहे.

Web Title: taxpayers names are announced