टीसीएसच्या नफ्यात 4.2 टक्के वाढ

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

महत्त्वाच्या बाजारपेठांमधील आर्थिक व राजकीय उलथापालथ घडूनही आर्थिक वर्ष 2016-17 व्यापक पातळीवर कंपनीचा विस्तार होत आहे. वर्षभरात आम्ही 1.4 अब्ज डॉलरचा महसूल वाढविला आहे. 
- राजेश गोपीनाथन, व्यवस्थापकीय संचालक, टीसीएस

मुंबई : देशातील आघाडीची सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी टीसीएसच्या मार्चअखेर संपलेल्या तिमाहीतील नफ्यात 4.2 टक्के वाढ होऊन तो 6 हजार 608 कोटी रुपयांवर गेला आहे. 

सन 2016 अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने 6 हजार 340 कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. टाटा समूहातील कंपनी असलेल्या टीसीएसचा समूहाच्या एकूण नफ्यात 60 टक्के वाटा आहे. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 4.2 टक्‍क्‍याने वाढून 29 हजार 642 कोटी रुपयांवर गेला आहे.

गेल्या वर्षी याच काळात कंपनीचा महसूल 28 हजार 449 कोटी रुपये होता. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीने 20 हजार 93 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कंपनीत एकूण 3 लाख 87 हजार 223 कर्मचारी आहेत.

मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा डिजिटल महसूल 17.9 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात टीसीएसच्या नफ्यात 8.3 टक्के वाढ होऊन तो 26 हजार 289 कोटी रुपयांवर पोचला आहे. याच काळात महसूल 8.6 टक्‍क्‍याने वाढून 1 लाख 17 हजार 966 कोटी रुपये झाला आहे. 

Web Title: TCS profit go up by 4.2 percent