टीसीएसचा नफा 8,131 कोटींवर 

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) सरलेल्या तिमाहीत 8,131 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला घवघवीत नफा मिळाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत झालेल्या नफ्याच्या तुलनेत त्यात 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 7,340 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

टीसीएसने विश्लेषकांचे अंदाज चुकवत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. टीसीएसच्या महसूलातसुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल 38,172 कोटी रुपयांवर पोचला आहे. महसूलातील वाढ 11.4 टक्के इतकी आहे. ऑपरेटिंग मार्जिन 24.2 टक्के इतके आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने शेअरधारकांसाठी 5 रुपये प्रतिशेअर अंतरिम लाभांश (डिव्हिडंड) जाहीर केला आहे.

आज मुंबई शेअर बाजारात 44.65 रुपयांच्या घसरणीसह 2131.45 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 7 लाख 99 हजार 802.04 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TCS Q1 profit flat at Rs 8,131 cr