‘टीसीएस’च्या भागधारकांची बायबॅक योजनेला मंजुरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नवी दिल्ली: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या(टीसीएस) भागधारकांनी कंपनीच्या 16,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेला बहुमताने मंजुरी दिली आहे. एकुण 99.81 टक्के भागधारकांनी बायबॅक प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजने 2012 साली अशीच मोठी बायबॅक योजना जाहीर केली होती.

बायबॅक योजनेअंतर्गत कंपनी प्रतिशेअर 2,850 रुपयांप्रमाणे सुमारे 5.6 कोटी शेअर्सची पुन्हा खरेदी करणार आहे. यासाठी कंपनीला सुमारे 16,000 कोटी रुपयेएवढा खर्च येईल. रोख साठ्यातून बायबॅकसाठी निधी वापरला जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना यातील काही वाटा मिळावा अशी मागणी केली जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास मजबूत होण्यास मदत होईल असे जाणकारांचे मत आहे.

मुंबई शेअर बाजारात सध्या(11 वाजून 15 मिनिटे) कंपनीचा शेअर 2323.95 रुपयांवर व्यवहार करत असून 3.10 रुपये अर्थात 0.13 टक्क्याने वधारला आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 457,444.70 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: TCS shareholders approve buyback